मराठी विषय शिकवला नाही तर शाळांना करणार दंड, सरकारने दिला इशारा

मराठी विषय शिकवला नाही तर शाळांना करणार दंड, सरकारने दिला इशारा

मराठी शाळा फक्त बोटावर मोजण्याएवढ्याच राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

  • Share this:

मुंबई 26 फेब्रुवारी : प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यासाठी सरकारने विधान परिषदेत आज विधेयक मांडलं आणि ते मंजूरही झालं. या विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी हे विधेयक मांडलं. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचं करण्याची तरतूद या विधेयकात आहे. केवळ मराठी शाळांमध्ये आपण मराठी शिकवून थांबू शकत नाही. इतर शिक्षण मंडळांमध्येही मराठी शिकवलीच पाहिजे असा कायदा केला पाहिजे असं सुभाष देसाई म्हणाले. त्यासाठीच सरकारने हे विधेयक मांडले आहे. सुभाष देसाई म्हणाले, या विधेयकाची अंमलबजावणी 2020-21या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. पहिली ते दहावी पर्यंत मराठी शिकवण्यात येईल.

या शैक्षणिक वर्षापासून पहिली आणि सहावीत मराठी भाषा सुरु करण्यात येईल. मराठीची सक्ती न करणाऱ्या शाळांना 1लाख रुपये दंड आकारण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. महाआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये खासगी शाळांचं पीक आलंय. या शाळांमधून मराठी विषय हद्दपार करण्यात आलाय. तर अनेक मराठी शाळांनीही मराठीचा त्याग करत इंग्रजीकडे आपला मोर्चा वळवला आहे. तर पालकांनीही आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्येच घालण्याला प्राधान्य दिलंय. त्यामुळे मराठी शाळांची संख्या झपाट्याने घटत आहे.

आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, फडणवीसांवरच्या आरोपांना दिलं उत्तर

शहरी भागात तर याचे प्रमाण सर्वात जास्त असून मराठी शाळा फक्त बोटावर मोजण्याएवढ्याच राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हेही वाचा...

भाजपला धक्का, फडणवीसांचे निकटवर्तीय खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर - सूत्र

फडणवीस यांच्या प्रश्नांच्या गुगलीवर अजित पवारांनी आदित्य ठाकरेंना वाचवलं

 

First published: February 26, 2020, 4:15 PM IST

ताज्या बातम्या