19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा

मंदार म्हात्रे असं या तरुणाचं नाव असून येत्या २७ एप्रिलला डोंबिवलीत हा दीक्षा सोहळा पार पडणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:29 PM IST

19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा

डोंबिवली, 23 एप्रिल : जैन धर्मीयांमध्ये लहान मुलांनी दीक्षा घेऊन साधू किंवा मुनी बनल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मात्र डोंबिवलीत १९ वर्षांचा एक मराठी युवक जैन धर्माची दीक्षा घेणार असून आयुष्यभर जैनमुनी म्हणून धर्मप्रचाराचं काम करणार आहे. मंदार म्हात्रे असं या तरुणाचं नाव असून येत्या २७ एप्रिलला डोंबिवलीत हा दीक्षा सोहळा पार पडणार आहे.

लहानपणापासून डोंबिवलीच्या तुकाराम नगर भागात वास्तव्याला असलेल्या म्हात्रे कुटुंबियांच्या शेजारी गुजराती जैन समाजाचे लोक वास्तव्यास होते. त्यांच्यासोबत मंदार लहानपणापासून जैन मंदिरात जाऊ लागला. तो १७ वर्षांचा असताना त्याची भेट एका बालमुनींशी झाली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...