Home /News /mumbai /

मराठीतून जाहिराती पाहिजेच, अ‍ॅमेझॉननंतर मनसेचा पश्चिम रेल्वेला इशारा

मराठीतून जाहिराती पाहिजेच, अ‍ॅमेझॉननंतर मनसेचा पश्चिम रेल्वेला इशारा

मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेकडून पश्चिम रेल्वेकडे मराठी अनिवार्य करण्याबद्दल मागणी करण्यात आली आहे.

    मुंबई, 27 डिसेंबर :  मराठीच्या मुद्यावर अ‍ॅमेझॉनला (amazon)दणका दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (mns railway union) आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. मनसेच्या  महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेकडून पश्चिम रेल्वेकडे मराठी अनिवार्य करण्याबद्दल मागणी करण्यात आली आहे.  पश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रके, जाहिराती प्रसिद्ध होत असतात. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती दिली जाते. पण यामध्ये सर्व पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांनुसार भाषाही वापरणे बंधनकारक केले आहे, पण असं असतानाही मराठी भाषेचा वापर केला जात नाही, असा आक्षेप मनसेनं घेतला आहे. शाहिद कपूर तिसऱ्यांदा होणार बाबा? पत्नीने दिली अशी रिअ‍ॅक्शन पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा बहुंताश भाग हा मुंबईमध्ये येत असून स्थानिक मराठी भाषेचा वापर केला जात नाही. मराठी भाषेचा वापर सुरू करणेबाबत आग्रह आहे. पण, त्याची दखल घेतली जात नसून अजूनही संबंधित अधिकारी मुजोरी करत आहे, असा आरोपही मनसेनं केला आहे. पश्चिम रेल्वे विभागाने तातडीने या विषयाची गंभीर दखल घेऊन प्रसिद्ध होणारी पत्रकं, जाहिरातीमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक करावा अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे. प्रियकरासोबत घरात पाहिलं अन् घात झाला, बहिणीकडून अल्पवयीन भावाची हत्या दरम्यान, 'मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन (amazon) नाही', असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) अ‍ॅमेझॉन विरोधात आक्रमक आंदोलन पुकारले होते. अखेर मनसेच्या 'खळळ-खट्याक' आंदोलनापुढे अ‍ॅमेझॉनला नांगी टाकावी लागली आहे. अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे. लवकरच मराठीमध्ये येत असल्याचा ॲमेझॉन आपल्या साइटवर नमूद केले आहे. शुक्रवारी ॲमेझॉनच्या पुणे आणि मुंबईतल्या गोडाऊनवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी  हल्लाबोल केला होता.  मनसे कार्यकर्त्यांनी खळ्ळ खट्याक स्टाईलने तोडफोड केली होती. त्यानंतर वसईमध्येही अ‍ॅमेझॉनच्या गोडाऊनची तोडफोड करण्यात आली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: MNS, मनसे

    पुढील बातम्या