निर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव

निर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव

आता मराठमोळी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवने धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

  • Share this:

26 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचच्या चर्चेने जोर धरला आहे.  बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचंच समर्थन केल्यानंतर, विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या माजी खासदार रेणुका चौधरी यांनी सर्वच क्षेत्रात कास्टिंग काऊच होत असल्याचं सांगत, महिला खासदारही त्यातून सुटलेल्या नसल्याचं म्हटलं. त्यानंतर आता मराठमोळी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवने धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

काय म्हटलंय उषा जाधवनं?

फिल्म इंडस्ट्रिमध्ये कास्टिंग काऊच सामान्य आहे. प्रस्थापित लोकांकडून लैंगिक शोषण हे सुद्धा कॉमन आहे. मला एकदा विचारण्यात आलं जर तुला संधी दिली तर त्या बदल्यात काय देशील? यावर मी त्यांना माझ्याकडे पैसे नाहीत, असं सांगितलं. त्यावर तो म्हणाला, नाही, नाही, नाही.. पैशाची गोष्ट नाही, जर कोणाला तुझ्यासोबत झोपायचं असेल, मग तो निर्माता असो वा डायरेक्टर..

एक अभिनेत्री म्हणून तुला शक्य तेव्हा आनंदाने लैंगिक संबंध ठेवावे लागतील. तो बोलता बोलता मला कुठेही स्पर्श करत होता, माझं चुंबन घेत होता. त्या धक्क्याने मी स्तब्ध झाले होते. मी त्याला रोखलं असता, त्याने तुला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय की नाही, अशी विचारणा करत, तुझा अॅटिट्यूड योग्य नसल्याचं म्हणाला.

First published: April 26, 2018, 3:05 PM IST

ताज्या बातम्या