ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

  • Share this:

मुंबई, २४ ऑगस्ट- ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. आज पहाटे ४ वाजता प्राणज्योत मालवली दुपारी १२ वाजता मुलुंडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. आतापर्यंत त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या सिनेमाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र काल त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. अनेक पुरस्कारांनी नावाजले गेलेल्या चव्हाण यांना २०१८ चा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार घोषित करण्यात आला.

विजय चव्हाण यांची गाजलेली नाटकं

मोरूची मावशी

श्रीमंत दामोदरपंत

तू तू मी मी

इशी ही फसवा फसवी

नवरा म्हणू नये आपला

ती तिचा दादला आणि मधला

विजय चव्हाण यांचे गाजलेले सिनेमे

वहिनीची माया

झपाटलेला

पछाडलेला

नो प्रॉब्लेम

नाना मामा

चष्मे बहाद्दर

नाथा पुरे आता

भरत आला परत

श्रीमंत दामोदरपंत ( सिनेमा)

हलाल

हुंटाश

First published: August 24, 2018, 7:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading