ही मराठमोळी अभिनेत्री हातावर बांधणार शिवबंधन, जितेंद्र आव्हाडांना तगडे आव्हान

ही मराठमोळी अभिनेत्री हातावर बांधणार शिवबंधन, जितेंद्र आव्हाडांना तगडे आव्हान

मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड रिंगणात आहे. त्यामुळे दिपाली सय्यद आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात लढत रंगणार आहे.

  • Share this:

उदय जाधव,(प्रतिनिधी)

मुंबई, 3 ऑक्टोबर: मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यद थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार आहे.'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपाली सय्यद शिवबंधन बांधणार आहे. दिपाली सय्यद ही मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड रिंगणात आहे. त्यामुळे दिपाली सय्यद आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात लढत रंगणार आहे.

शिवसेनेचे मुस्लिमसेलिब्रिटीमराठी कार्ड

कळवा मुंब्रातून अभिनेत्री दिपाली सय्यदला उमेदवारी देऊन शिवसेना 'मुस्लिमसेलिब्रिटीमराठी कार्ड' वापरणार आहे. रात्री उशीरा दिपाली सय्यदच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेचे तगडे आव्हान असणार आहे.

या भाजपच्या खासदाराशी घेतला होता पंगा...

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई पाणी योजनेसंदर्भात माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांनी त्याबाबात माफी मागावी अन्यथा आपण महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिला होता.

'देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे', या आशयाचे वक्तव्य साकळाई पाणी योजनेबाबत खासदार सुजय विखे पाटील यांनी गुंडेगाव (ता. नगर) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात केले होते. त्याला सय्यद यांनी आक्षेप घेतला होता. नगर येथे पत्रकार परिषद बोलावून सय्यद यांनी डॉ.विखे यांचा समाचार घेतला होता. त्या म्हणाल्या होत्या की, डॉ.विखे यांचे वक्तव्य मला पटलेले नाही. कारण सुजय डॉक्टर असून सुजाण नागरिक आहेत. ते खासदार असून त्यांच्या घराण्याचे संस्कारसुद्धा त्यांच्यावर आहेत. एक व्यक्ती म्हणून त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. याबाबत त्यांनी माफी मागितली नाही, तर महिला आयोगाकडे मी तक्रार करणार आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

मागितला होता पाठिंबा..

'मला बहीण मानले व लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे यांनी माझ्याकडे पाठिंबा मागितला होता, त्यांना मी पाठिंबाही दिला होता; मात्र, विखे यांचे ‘साकळाई’चे श्रेय घेण्यासाठी त्यांनी केलेले वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे आहे. विखे यांनी या वक्तव्याबाबत माफी मागणे गरजेचे आहे. अन्यथा, महिला आयोगाकडे तक्रार करावी लागेल’, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्थानिक नेते असेच वागत राहिले तर श्रीगोंदा मतदारसंघातून कृती समितीचा उमेदवार उभा करीन, असेही सय्यद यांनी सांगितले.

VIDEO : तुम्हाला आचारसंहिताच कळत नाही, शिवसेना नेत्याची पोलिसांसोबत बाचाबाची

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 09:37 PM IST

ताज्या बातम्या