मराठा समाज हा कुणबीच, मागसवर्ग आयोगाचा निष्कर्ष

मराठा समाज हा कुणबीच, मागसवर्ग आयोगाचा निष्कर्ष

मराठा आरक्षणाची मागणी मागासवर्ग आयोगानं रास्त ठरवली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 29 जानेवारी : मराठा समाजाला आरक्षण देणारा मागसवर्ग आयोगाचा अहवाल आता उघड झाला आहे. या अहवालामध्ये मराठा समाज हा कुणबी जातीतच मोडला जातो असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकाराला दिले होते. अखेर राज्य सरकारने हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

त्यामुळे मागासवर्ग आयोगाच्या अहवालात अनेक बाबी आता समोर आल्या आहे. मराठा आरक्षणाची मागणी मागासवर्ग आयोगानं रास्त ठरवली आहे. दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्यांत मराठा समाजातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, असा दावा मागासवर्ग आयोगाने केला आहे.

मराठा आणि कुणबी एकच समाज आहे. कुणबींचा ओबीसींमध्ये समावेश केला असल्यानं मराठा समाजाचाही फार पूर्वीच मागास वर्गात समावेश करायला हवा होता, असंही यात म्हणण्यात आलं आहे.

मराठा ही जात नव्हे तर मराठी बोलणारे म्हणजे मराठा, या समुदायाची जात कुणबी असून ते कृषी व्यवसाय करणारे आहेत. मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे.

मराठा समाजातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केलेल्या आहेत. २०१३ ते २०१८ च्या दरम्यान १३,३६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात २३.५६ टक्के शेतकरी हे मराठा तर १९.३४ टक्के शेतकरी कुणबी होते, असा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे.

या आकडेवारीवरुन मराठा समाजात ताण आणि निराशा इतकी आहे की, त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. इतर जातीपेंक्षा कृषीमध्ये मराठा समाज अधिक प्रमाणात आहे, असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2019 09:40 PM IST

ताज्या बातम्या