Elec-widget

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही - रामदास आठवले

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही - रामदास आठवले

मराठा आरक्षण न्यायलायत टिकणार नाही असं विधान केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पण...

  • Share this:

मोहन जाधव, प्रतिनिधी


खोपोली, 08 डिसेंबर : मराठा आरक्षण न्यायलायत टिकणार नाही असं विधान केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची आग्रही भूमिका असल्याचंही रामदास आठवले म्हणाले आहेत.


खोपोली येथे जिल्हा युवक मेळाव्यादरम्यान पत्रकार परिषदमध्ये बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे. तर मंदिरं, पुतळे बांधले नाहीत तर मतं मिळणार नाहीत असंही आठवले म्हणाले. त्याचबरोबर भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती भाजपाला फायदेशीर असल्याचा उल्लेखही त्यांनी या परिषदेत केला.

Loading...


यावेळी त्यांनी राम मंदिर वादावरही भाष्य केलं. अयोध्येतील जागा ही बौद्ध समाजाची असून ती वादग्रस्त आहे. त्याबदल्यात आमहाला दुसरीकडे जागा मिळावी. तर याआधीही त्यांनी या विषयावर विधान केलं होतं.


हेही वाचा: असं असेल मराठा समाजाचं जात प्रमाणपत्र!


‘अयोध्या तर बुद्धाची भूमी’


राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘इतिहास पहिला तर ती भूमी बुद्धाची आहे . जर सर्वधर्मसमभावाची भूमिका घ्यायची असेल तर त्याठिकाणी बुद्ध मंदिरासाठीही जागा दिली पाहिजे. कोर्टाचा निकाल येईपर्यंत मंदिर बांधण्याची घाई करू नये. राम मंदिर बांधावे पण मुस्लिमांवर दबाव टाकून बांधू नये, असा सल्ला आठवलेंनी दिला होता. ते मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.


बुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्यावर गोळी मारणाऱ्याचा हा VIDEO अंगावर शहारा आणेल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 09:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...