• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Maratha Reservation: 'आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, मूक आंदोलन सुरूच राहणार': संभाजीराजे

Maratha Reservation: 'आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, मूक आंदोलन सुरूच राहणार': संभाजीराजे

Maratha Reservation: खासदार संभाजीराजे आणि मराठा समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

  • Share this:
मुंबई, 17 जून: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात बुधवारी मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर आता राज्य सरकार (Maharashtra Government), संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांमध्ये बैठक झाली. जवळपास दोन तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीत काय-काय झालं याची माहिती दिली. संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे  आंदोलनाची सरकारने दखल घेतली बैठकीत मराठा आरक्षणा आणि आमच्या मागण्यां संदर्भात सविस्तर चर्चा झाली आम्ही सहा मागण्या बैठकीत मांडल्या पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा येत्या गुरुवारी रिव्ह्यू पिटीशन दाखल होणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं येत्या शनिवारी पुण्यात सारथीच्या संदर्भात बैठक होणार आमची मागणी होती 1000 कोटी रुपये जाहीर करा, यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैशांची अडचण नाहीये सारथीला आर्थिक मदत देण्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं मराठा प्रतिनिधींना सारथीत नियुक्त करा कोपर्डी प्रकरणात न्यायालयात अपील करा पुढील सहा महिन्यांत कारवाई करावी संभाजीराजेंची सरकारकडे मागणी वसतिगृह बांधणीसाठी राज्य सरकार पैसे देणार 23 जिल्ह्यांत मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, आमची सरकारसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील सर्व समन्वयक नाशिकला जमणार आणि त्यावर चर्चा करुन पुढील निर्णय घेणार 21 जून रोजी नाशिकला मूक आंदोलन होईल अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या केल्या राज्य सरकार रिव्ह्यू पिटीशन दाखल करणार पुढील आठवड्यात फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार योग्य तयारी करुन कोर्टात भूमिका मांडू संभाजीराजे यांच्या मागणीनुसार रविवारी सारथीबाबत उपमुख्यमंत्री बैठक घेतील मराठा समाजाच्या रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लावण्याच्या एमपीएससीला सूचना आपली चर्चा सुरू राहील तुम्ही आंदोलनाबाबत फेरविचार करावा असं मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं आहे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याबाबत एक केस वगळता इतर सर्व केसेसमधील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे बैठकीत काय घडलं? बैठकीत जवळपास वीस मिनिटे संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या मागण्या मांडल्या. त्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. बैठकीत अशोक चव्हाणांनी म्हटलं, आम्ही पंतप्रधान यांना भेटलो त्यांना राज्याचे अधिकार कळवले. घटना दुरुस्ती नंतर राज्यांचे अधिकार कमी झाले आहेत. 50 टक्क्यांची मर्यादा काढल्या शिवाय रिव्ह्यू पिटीशन दाखल करता येणार नाही. महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी म्हटलं, 1 तारखेपर्यंत अंतिम निकालाचे विषय प्रलंबित आहे. लवकरच कोपर्डी प्रकरणी न्यायालयात दाद मागू. रिव्ह्यू पिटीशन ड्राफ्ट तयार झाला असून पुढच्या आठवड्यात दाखल केल जाईल. केंद्र सरकारच रिव्ह्यू पिटीशन केवळ अधिकार राज्याचा की केंद्राचा यावर आहे. मात्र राज्य सरकारच रिव्ह्यू पिटीशन पूर्ण स्वरूपाचं राहील. 338 B विषय असा आहे की, प्रिव्हीव्हमध्ये दम नाही म्हणून हे पॅरलल केलं असा मेसेज जाईल. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे.
Published by:Sunil Desale
First published: