'सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलन का? एकत्र बसून तोडगा काढू' : मुख्यमंत्री

Maratha Reservation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक संभाजीराजे आणि मराठा समन्वयकांसोबत बैठक झाली.

Maratha Reservation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक संभाजीराजे आणि मराठा समन्वयकांसोबत बैठक झाली.

  • Share this:
    मुंबई, 17 जून: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज मराठा समन्वयक, संभाजीराजे छत्रपती आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक जवळपास तीन तास सुरू होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला? त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू. एक समिती नेमून प्रमुख प्रश्न लगेच सोडवण्याचे काम करू सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात येतील हा विश्वास बाळगा. समाजातील निवडक जणांची एक समिती नेमून त्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी आज मांडलेले समाजाचे प्रमुख प्रश्न लगेच सोडविण्यासाठी समन्वयाने काम करू असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधीना आश्वस्त केले. Maratha Reservation: 'आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, मूक आंदोलन सुरूच राहणार': संभाजीराजे मी राजेंना धन्यवाद देतो... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढे म्हटलं की, मी राजेंना धन्यवाद देतो. संवेदनशील विषय असून राजेंनी अतिशय सामंजस्याने भूमिका घेतली. आम्ही सर्व पक्ष एकमताने समाजाच्या पाठीशी आहोत. कोरोनाने आलेले आर्थिक संकट मोठे आहे मात्र आम्ही समाजाच्या हितासाठी पैसा कमी पडू देणार नाही, कुठलेही अडथळे येऊ देणार नाही. संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जाणून घ्या सविस्तर रस्तावर येऊ नका, आंदोलन करू नका मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कायदेशीर बाबींमध्ये देखील आम्ही निश्चितपणे मार्ग काढू. रस्तावर येऊ नका, आंदोलन करू नका. मी देखील आंदोलने करणाऱ्या पक्षाचा नेता आहे. पण सरकार तुमचं ऐकतय तर मग आंदोलन कशासाठी आणि कुणाविरुद्ध असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की तुमच्या स्तरावर एक समिती स्थापन करून शासनाकडील प्रलंबित मुद्द्यांचा तातडीने पाठपुरावा शक्य होईल. आपण देखील मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर विभागनिहाय आढावा घेऊन तातडीने काही अडचण असल्यास दूर करू असेही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी असला तरी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेले सर्व विषय सोडविणार आहे असेही ते म्हणाले. कोपर्डी खटला जलदगतीने चालविण्यासाठीची विनंती आणि आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका लवकरच दाखल करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रलंबित विषयावर लवकरच खातेनिहाय आढावा बैठक घेऊ.
    Published by:Sunil Desale
    First published: