• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Maratha Reservation: संभाजीराजेंनी बैठकीत राज्य सरकारकडे केल्या 'या' प्रमुख 5 मागण्या

Maratha Reservation: संभाजीराजेंनी बैठकीत राज्य सरकारकडे केल्या 'या' प्रमुख 5 मागण्या

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने मराठा समन्वयक आणि संभाजीराजे यांना चर्चेसाठी बोलावले.

  • Share this:
मुंबई, 17 जून: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर कोल्हापूर (Kolhapur) येथे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मूक आंदोलन (Muk Aandolan) करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावले. या बैठीकत मराठा समाजाने पाच प्रमुख मागण्या केल्या (5 major demands of Maratha Community) आहेत. पाहूयात कुठल्या आहेत या मागण्या... बैठकीतील राज्य सरकारकडे केलेल्या प्रमुख 5 मागण्या 1) मराठा आरक्षणामुळे 2014 ते पाच मे 2021 पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात 2) ‘ओबीसी‘च्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा 3) 'सारथी' संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 'सारथी' संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तत्काळ सुरू करावा. संस्थेला स्वायत्तता पुन्हा बहाल करावी. ...तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही, संभाजीराजेंचा सरकारला इशारा 4) अण्णासाहेब पाटील महामंडळाला दोन हजार कोटींचा निधी द्यावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची 10 लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रूपये करावी. 5) शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रूपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2000 रूपये प्रति महिना दिले जातात. ही रक्कम वाढवावी. शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीट्स निर्माण कराव्यात. सह्याद्री अतिथीगृहात सुरू असलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब, संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत सकल मराठा समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
Published by:Sunil Desale
First published: