मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत मंगळवारी बैठक

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत मंगळवारी बैठक

ऐतिहासिक औरंगाबादेत कचरा प्रश्नावरून हिंसाचार पेटतोय, क्षुलक कारणावरून दंगल घडतेय हे महाराष्ट्रासाठी सोभनिय नाही.

ऐतिहासिक औरंगाबादेत कचरा प्रश्नावरून हिंसाचार पेटतोय, क्षुलक कारणावरून दंगल घडतेय हे महाराष्ट्रासाठी सोभनिय नाही.

विधानसभेत रणकंदनानंतर मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ती बैठक रद्द करण्यात आली आहे.

    मुंबई, 26 नोव्हेंबर : मराठा आरक्षणावरुन हिवाळी अधिवेशनात आजही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहण्यास मिळाला. मराठा आरक्षणाचा अहवाल सादर करा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. तर सरकारने थेट विधेयक मांडण्याची भूमिका घेतली आहे. विधानसभेत रणकंदनानंतर मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ती बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता उद्या मंगळवारी होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयकाच्या प्रारूप आराखड्यासंदर्भात चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे आरक्षणासाठी मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडली. 29 तारखेला पटलावर मांडण्यात येणारं विधेयक 30 तारखेपर्यंत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला विनोद तावडे, सुभाष देशमुख, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी निलंगेकर, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे आणि दीपक सावंत उपस्थित होते. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातला एटीआर म्हणजेच संपूर्ण अहवाल सादर करायचा की नाही यासंदर्भात उद्या होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. सरकार आणणार विधेयक एकीकडे विरोधकांनी मराठा आरक्षणावरुन कोंडीत पकडल्यामुळे सत्ताधारी भाजपने अहवालाऐवजी थेट विधेयकच सभागृहात मांडण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी 29 नोव्हेंबरला विधिमंडळात विधेयक मांडण्यात येणार असून, 16 टक्के आरक्षणासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनी दिली. परंतु, मराठा आरक्षण विधेयक जरी सभागृहात मांडण्यात येणार असलं तरी याबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडला जाणार नाही. त्यामुळे सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत विरोधकांनी आंदोलनं केली.  विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विधानभवनाबाहेर मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 7 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विधान भवनाबाहेर हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मराठा आरक्षण जाहीर करण्यात यावं, याआधीच्या आंदोलनकर्त्यांवरील खटले मागे घेतले जावेत, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.   ताब्यात घेण्यात आलेले सर्व कार्यकर्ते सोलापूरचे जिल्हातील आहेत. ================
    First published:

    Tags: BJP, Congress, Maratha reservation, Martha andolan, Mumbai, NCP, Session, मराठा आंदोलन, हिवाळी अधिवेशन

    पुढील बातम्या