उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठा आंदोलकांचे उपोषण मागे

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठा आंदोलकांचे उपोषण मागे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. उ

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्च्याकडून सुरू असलेलं बेमुदत उपोषण मागे घेण्यात आलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली.

मराठा आरक्षणासह १९ मागण्यासाठी आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्च्याचे कार्यकर्ते उपोषण करत होते. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर झाल्यामुळे सगळीकडे जल्लोष केला जात आहे. आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी याचा आनंद केला पण आंदोलक आंदोलनावर ठाम होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना आश्वासनं दिलं त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत असल्याची जाहीर केलं.

आजचा दिवस ऐतिहासिक आणि आनंदाचा आहे.मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे. मराठा मोर्चातील धरपकड झालेल्या कार्यकर्त्यांना तात्काळ सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी आजच बोलणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलं. तसंच इतर ज्या मागण्या आहेत त्यावरही चर्चा करणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि इतर पदाधिकारी सोबत होते.

दरम्यान, मराठा समाजानं आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आलं आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मंजूर करण्यात आलं आहे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळालं आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षण तात्काळ लागू होणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आधीच ठरल्याप्रमाणं या विधेयकावर कुठलीही चर्चा झाली नाही. ते आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. त्यानंतर मुख्यंत्र्यांनी विधान परिषदेतही विधेयक मांडलं. तिथंही ते आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं.

==========================================================

First published: November 29, 2018, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading