मराठा आरक्षण: जातीने ब्राह्मण असल्यामुळेच माझ्यावर आरोप, फडणवीसांचा पलटवार

मराठा आरक्षण: जातीने ब्राह्मण असल्यामुळेच माझ्यावर आरोप, फडणवीसांचा पलटवार

'आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला चांगलेच माहित आहे. हे फक्त राजकारणासाठी आरोप करताहेत.'

  • Share this:

मुंबई 17 सप्टेंबर: मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यातलं वातावरण चांगलच तापलं आहे. आरक्षणाला स्थगिती देत हे प्रकरण सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला होता. आता त्यावर आरोप-प्रत्यारोपांनाही सुरूवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर पलटवार करत उत्तर दिलं आहे. मी जातीने ब्राह्मण असल्यामुळे काही लोक सगळं खापर माझ्यावर फोडत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षणाचा घोळ झाला असा आरोप भाजपने केला आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत त्यामुळे हे आरक्षण रखडलं असे काँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहेत.

फडणवीस पुढे म्हणाले, मला असं म्हणणं शोभणारं नाही, मात्र मी स्पष्टपणे सांगतो की केवळ माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्या माथी सर्व काही आरोप केले तर चालतील असं काही लोकांना वाटतं. ते मोजकेच लोकं आहेत. मात्र आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला चांगलंच माहित आहे असंही ते म्हणाले. ‘एबीपी-माझा’शी बोलतांना त्यांनी ही टीका केली.

Covid संसर्गाच्या गतीत मोठी वाढ; 39 दिवसांत 2 वरून रुग्णसंख्या 3 कोटींच्या पार

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे धक्कादायक आहे. मात्र या संदर्भात केंद्र सरकारकडे बोट दाखवनं योग्य नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. या प्रश्नावर राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा आहे असंही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेना खासदारांची गुरूवारी दिल्लीत बैठक झाली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात पंतप्रधानांची वेळ घेण्यात यावी आणि खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानांची भेट घ्यावी असं मत खासदारांनी व्यक्त केलं.

#BREAKING: पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार-गृहमंत्री

तर काही संघटनांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

सर्वच पक्ष म्हणतात की ओबीसीच्या, दलितांच्या, आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता व्यवस्था करा. ओबीसींना 27 नाही 19 टक्के आरक्षण आहे आणि 19 मध्ये 6 कोटी लोक आहेत. त्यामुळे त्यांनाही अधिकच आरक्षण मिळायला हवे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 17, 2020, 3:39 PM IST

ताज्या बातम्या