मराठा आरक्षण अंतिम सुनावणी: माजी अॅटर्नी जनरल मांडणार सरकारची बाजू

मराठा आरक्षण अंतिम सुनावणी: माजी अॅटर्नी जनरल मांडणार सरकारची बाजू

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या बुधवारपासून उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 03 फेब्रुवारी: मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या बुधवारपासून उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. यासाठी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्या ऐवजी ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशाचे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 06 फेब्रुवारीपासून यासंदर्भातील सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगेरे यांच्या खंडपीठासमोर येणार आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी साळवे बाजू मांडण्यासाठी उपलब्ध होणार नसल्याने सरकारने सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. अखेर रविवारी मुकूल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नवी दिल्ली या प्रकरणाची सर्व बाजू जाणून घेतली.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळेच आरक्षणाला देण्यात आलेले याचिकेवर सरकारची बाजू हरीश साळवे मांडणार होते. तशी घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र साळवे यांना काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सुनावणीसाठी परदेशात जावे लागणार असल्याने ते मुंबईला येऊ शकणार नाहीत. त्यामुळेच राज्य सरकारची बाजू मांडावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहतगी यांनी विनंती केली होती. ही विनंती रोहतगी यांनी मान्य करताच त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. रोहतगी यांच्या समावेत अॅड.परमजीत सिंह पटवालिया आणि अॅड.कटणेश्वरकर यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रकरणात राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही याची सर्वांनी खात्री बाळगावी, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

VIDEO: 'हवं तर मला मारा, पण माझ्या कोंबडीला सोडा'

First published: February 3, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या