मुंबई, 27 मे: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतल्यावर आता खासदार संभाजीराजे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी ही भेट झाली. जवळपास एक तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विविध विषयांवर या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. मराठा समाजाला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आहे असं वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.
राज ठाकरेंचे मत काय?
खासदार संभाजीराजे यांनी पुढे म्हटलं, मराठा समाजाला न्याय कसा द्यावा ही जबाबदारी सर्व पक्षाच्या प्रमुखांची आहे. यासाठीच माझे प्रयत्न सुरू आहेत. समाजाला न्याय मिळावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. राज ठाकरे हे खऱ्या अर्थाने जात-पात मानत नाही. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत.
युवराज संभाजीराजे छत्रपती ह्यांनी आज मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची कृष्णकुंज ह्या निवासस्थानी भेट घेतली. त्या भेटीनंतर छत्रपती संभाजीराजांनी दिलेली प्रतिक्रिया... #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य pic.twitter.com/oPyIvpuwbU
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 27, 2021
छत्रपती शाहू महाराज आणि राजसाहेबांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांचे घनिष्ठ स्नेहसंबंध होते. आजही छत्रपती घराणं आणि ठाकरे घराण्याचं नातं तितकंच सलोख्याचं आहे.
मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारी 'ती' संस्था भाजप आणि RSS संबंधित, काँग्रेसचा गंभीर आरोप
राजसाहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये एक समान दुवा आहे तो गडकिल्ले संवर्धनासाठी काम करण्याचा. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी काय करता येईल यावरही आमच्या दोघांत चर्चा झाली असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
उद्या मुख्यमंत्र्यांची आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या दुपारी 12 च्या सुमारास राज्याचे विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे अशी माहितीही यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation, Raj Thackeray, Sambhajiraje chhatrapati