मराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते

मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काही वेळापूर्वी एका तरुणानं न्यायालयाबाहेर हल्ला केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 04:44 PM IST

मराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार-  गुणरत्न सदावर्ते

मुंबई, 10 डिसेंबर : ‘समाजकंटकांनी त्रास दिला तरी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार,’ अशी प्रतिक्रिया हल्ला झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काही वेळापूर्वी एका तरुणानं न्यायालयाबाहेर हल्ला केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश दिले आहेत. मला आलेल्या १००० धमक्यांमध्ये साता-यातील खासदार उदयनराजे भोसले यांचाही समावेश असल्याचा सदावर्ते यांचा आरोप आहे.

कोण आहे सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण?

मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैद्यनाथ पाटील हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे. याबाबत वैद्यनाथ यांचे भाऊ संभाजी मुणगे पाटील यांनी माहिती दिली आहे.

वैद्यनाथ पाटील हे संभाजी ब्रिगेड आयोजित करत असलेल्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात, असंही संभाजी पाटील यांनी म्हटलं आहे. वैद्यनाथ पाटील यांनी अॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला केल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Loading...

वैद्यनाथ पाटील हे मूळचे जालना जिल्हातील आहेत. त्यांचे आई-वडिल हे गावी शेती करतात. वैद्यनाथ पाटील यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तसंच ते नोकरीच्या शोधात पुण्याला आले होते, असं त्यांच्या भावाने म्हटलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या वैद्यनाथ पाटील यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्या आहेत. हल्ला करताना वैद्यनाथ पाटील यांच्यासोबत इतरही काही तरूण होते. पण गुणवर्ते यांना एकट्या वैद्यनाथ पाटील यांनी मारहाण केली आहे.

वैद्यनाथ पाटील यांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केल्यानंतर इतर वकिलांनी वैद्यनाथ पाटील यांनाही मारहाण केली आहे.


मराठा आरक्षण : वकील सदावर्तेंवर असा झाला हल्ला, पाहा हा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...