मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण घडामोड, 3 मोठ्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण घडामोड, 3 मोठ्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता

आरक्षण प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच सरकारने आता वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.

आरक्षण प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच सरकारने आता वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.

आरक्षण प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच सरकारने आता वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबई, 26 फेब्रुवारी : सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मोठा पेच निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून याच मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापत आहे. आरक्षण प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच सरकारने आता वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.

मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाणांनी फोनवरून साधला संवाद?

मराठा आरक्षणावरून होणाऱ्या या संभाव्य बैठकीबाबत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या रविवारी या नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करून कोर्टात भूमिका मांडण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - मोठी बातमी : ठाणे शहरात मनाई आदेश, कोणत्या गोष्टींवर असणार बंदी? जाणून घ्या

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका वारंवार भाजपकडून करण्यात येते. भाजपसोबत असणारे

मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांनीही अनेकदा सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता सरकारने गुगली टाकत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चर्चा करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे या हाय व्होल्टेज बैठकीत नेमकं काय घडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: Maratha reservation, मराठा आरक्षण maratha aarakshan