ऐतिहासिक! मराठ्यांना 16 टक्के आरक्षण जाहीर, विधेयक एकमताने मंजूर

ऐतिहासिक! मराठ्यांना 16 टक्के आरक्षण जाहीर, विधेयक एकमताने मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विधेयकाला सर्वपक्षीयांनी एकमताने सहमती दर्शवल्याने हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विधेयकाला सर्वपक्षीयांनी एकमताने सहमती दर्शवल्याने हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार आहे.

काही वेळापूर्वी मराठा आरक्षणाबाबतचा एटीआर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला आहे.

मराठा आरक्षणाच्या एटीआरमध्ये काय तरतुदी करण्यात आल्या?

- मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार

- एकूण नियुक्तांच्या 16 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे

- एसईबीसीच्या आरक्षणसाठी उन्नत आणि प्रगत गटाचं प्रतिनिधित्त्व

- मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण

- एसईबीसी वर्गातलं आरक्षण गुणवत्तेनुसार

- ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही

दरम्यान, भाजपतर्फे औरंगाबादेत जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. भाजप प्रदेश कार्यालयावर आरक्षणाचा जल्लोष होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील जल्लोषात सामील होणार आहेत. पेढे आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात येणार आहे.

VIDEO : 'पोराचं लग्न झालं, आज पूजा होती पण क्षणात उद्ध्वस्त झाला संसार'

First published: November 29, 2018, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading