मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आणि मध्य मुंबईतील शाळांना सुट्टी

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आणि मध्य मुंबईतील शाळांना सुट्टी

सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळांचा यामध्ये समावेश असणार आहे.

सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळांचा यामध्ये समावेश असणार आहे.

सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळांचा यामध्ये समावेश असणार आहे.

  08 आॅगस्ट : मुंबईत उद्या बुधवारी निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आणि मध्य मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  उद्या बुधवारी मुंबईत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदान असा मराठा मोर्चा निघणार आहे. राज्याच्या राजधानी मुंबईत हा मोर्चा निघणार असल्यामुळे गर्दीचा उच्चांक मोडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण विभागाने दक्षिण मुंबईतल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे.  दक्षिण आणि मध्य मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी असणार आहे. सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळांचा यामध्ये समावेश असणार आहे.

  डबेवाले मोर्चात सहभागी

  मुंबईत उद्या बुधवारी निघणाऱ्या मराठा मोर्च्यामध्ये मुंबईतले डबेवाले सहभागी होणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबईकरांना डबेवाल्यांची सेवा बंद राहणार आहे. एकूण 5000 डबेवाल्यांचा मोर्चात सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे मोर्चात सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांना सुट्टी देण्यात आलीये.

  First published:

  Tags: शाळा