PM मोदींवरच्या त्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणा, मराठा समाजाची मागणी

PM मोदींवरच्या त्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणा, मराठा समाजाची मागणी

हे पुस्तक कोणत्याही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नये, जर असे झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल

  • Share this:

ठाणे 14 जानेवारी : आज के शिवाजी नरेंद्र मोदी ' या पुस्तकावरून सध्या वादंग निर्माण झाला असून ठाण्यातील मराठा आणि बहुजन समाजाच्या नेत्यांनी देखील या पुस्तकाच्या विरोधात दंड थोपटले आहेत . हे पुस्तक कोणत्याही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नये, जर असे झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच या  नेत्यांनी दिला आहे. यासंदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात मराठा समाजाच्या वतीने हा इशारा देण्यात आलाय. त्यामळे या पुस्तकावरून येत्या काही काळात ठाण्यात देखील  वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून वाद सुरू आहे. या पुस्तकावर सगळ्यांनीच टीका केली असून, पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. हे वादाचं हे लोण आता ठाण्यात देखील सुरू झाले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मुद्दा उचलण्यात असून यामुळे वातारण चांगलेच तापलं आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले असून या पत्रामध्ये त्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्या सोबत करणे म्हणजे हा केवळ अपराधच नव्हे तर, महाराष्टाची माती कलंकित करण्यासारखे असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

उदयनराजेंचा शिवसेना आणि राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला, 10 ठळक मुद्दे

भाजपने झटकले हात

भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

'जाणता राजा फक्त शिवाजी महाराज', उदयनराजेंची शरद पवारांवर खरमरीत टीका

भाजपच्या आयटी सेलचे संजय मयूख यांनीदेखील ट्विटरवरून पुस्तकाबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मयूख यांचा व्हिडिओ भाजपच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात मयूख यांनी म्हटलं आहे की, 'गोयल यांनी हे त्यांचे वैयक्तिक लेखन असून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते मागे घेतो असं सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर पुस्तकाचे प्रकाशनही भाजपचे नाही.'

First published: January 14, 2020, 1:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading