58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा

58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा

'आगामी निवडणुकीत कमळावर बहिष्कार तर घालूच पण जिथे जमेल तिथे भाजपच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करू.'

  • Share this:

स्वाती लोखंडे-ढोके,मुंबई, 23 फेब्रुवारी : 'मराठा समाजाचे 58 मोर्चे निघूनही सरकार न्याय देत नाही. त्यामुळे कमळावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,' असं म्हणत मराठा क्रांती मोर्च्याच्या आयोजकांनी सरकारवरील आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी सरकारने विश्वासघात केल्याचं म्हटलं आहे.

'आगामी निवडणुकीत कमळावर बहिष्कार तर घालूच पण जिथे जमेल तिथे भाजपच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करू. युती विरोधातही निवडून येणारे आमचे उमेदवार उभे करू. अॅट्रोसिटीसारख्या जाचक कायद्यांमुळे 80 टक्के युवकांना त्रास होतो. या कायद्यात बदल करण्यासाठी एक कमिटी स्थापन करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण तेही आश्वासन पाळलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे खुनशी आहेत,' असं म्हणत मराठा आंदोलकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

आधी राम मंदिर मग सरकार अशी काही लोक घोषणा करतात पण शिवाजी महाराजांना मात्र सोयीने विसरतात

मराठा वसतीगृहा बाबत सरकार नाकर्ते

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबतही सरकारने फसवणूक केली.

कर्जमाफी काही लोकांनाच मिळाली पण आयोगाच्या तरतुदी लागू करण्याबाबत सरकार विचारही करत नाही

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून नोकऱ्या देणारा मराठा समाज उभा राहणार होता. 20-20 हजार रुपये भरून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार तरुणांनी केला, पण बँकाही कर्ज देत नाही.

चंद्रकांत पाटील फक्त घोषणा करतात. आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात मात्र काही नाही

आम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणतात पण एकाही गुन्हा मागे घेतला गेला नाही

एसटी बस फोडल्याचे आरोप लावतात पण बस या मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच फोडण्यात आल्या.

LIVE VIDEO : लग्न सोहळ्यात बंदुकीने पैसे उडवण्याचा प्रयत्न, गोळी लागून डान्सरचा मृत्यू

First published: February 23, 2019, 2:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading