S M L

Mumbai Band- जोगेश्वरी येथे आंदोलकांनी ट्रेन थांबवली

चर्चगेटकडे जाणारी जलद लोकल जोगेश्वरी येथे रोखण्यात आली आहे

Updated On: Jul 25, 2018 10:01 AM IST

Mumbai Band- जोगेश्वरी येथे आंदोलकांनी ट्रेन थांबवली

मुंबई, २५ जुलैः मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सध्या राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. आता हे आंदोलन हिंसक वळण घेत असून, जोगेश्वरी येथे आंदोलकांनी ट्रेन थांबवली आहे. चर्चगेटकडे जाणारी जलद लोकल जोगेश्वरी येथे रोखण्यात आली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेचा खेळखंडोबा झाला आहे. आंदोलनकर्त्यांच्या या आक्रमकतेमुळे चाकरमान्यांचे फार हाल होत आहेत. तर नालासोपाऱ्यात मोर्चाला हिंसक वळण आले असून, दुकान बंद न करणाऱ्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच दुकानदारांनाही मारहाण करण्यात आली आहे.

आज २५ जुलैला या आंदोलनाची झळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना बसणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, सातारा या प्रमुख शहरांमध्ये आज आंदोलन करण्यात येणार आहे. नवी मुंबई येथील घणसोली येथे आज पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंतची बेस्ट सेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे- वाशी रेल्वेने प्रवास करणं सोयीस्कर ठरणार आहे. नवी मुंबईतील अनेक शाळा कॉलेजमधील मुलांना कोणतीही पूर्व कल्पना न देता घरी पाठवण्यात आले. या सगळ्या गदारोळात सर्वसामान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईत आयोजीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान येत्या 9 ऑगस्टला आंदोलकांकडून ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला. ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मोर्चेकरांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. या सगळ्याचा अंदाज घेत पोलिसांचा मोठा ताफा जागोजागी तैनात करण्यात आला आहे. पण मोर्चेकरांच्या गर्दीने ठाणे पूर्व मार्ग पूर्णपणे जाम झाला आहे.

हेही वाचा-

लोकलच्या दारात पदर अडकला,जीव थोडक्यात वाचला

Loading...
Loading...

भिवंडी 3 मजली इमारतीचा भाग कोसळला, 5 बचावले पण 1 महिलेचा मृत्यू

पाकिस्तानात पंतप्रधानांच्या गादीवर कोण बसणार? आज मतदानाला सुरूवात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2018 10:01 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close