नवी मुंबईत दुसऱ्या दिवशीही इंटरनेट सेवा बंद

नवी मुंबईत दुसऱ्या दिवशीही इंटरनेट सेवा बंद

कालच्या महाराष्ट्र बंदचा परिणाम मुंबईपेक्षा जास्त नवी मुंबईत जाणवला. नवी मुंबईतल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

  • Share this:

नवी मुंबई, 26 जुलै : कालच्या महाराष्ट्र बंदचा परिणाम मुंबईपेक्षा जास्त नवी मुंबईत जाणवला. नवी मुंबईतल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जाळपोळ दगडफेक अशा घटनांनी नवी मुंबईचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. आज आंदोलनच्या दुसऱ्या दिवशी नवी मुंबईचं जनजीवन पूर्णपणे सुरळीत आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीने आणि कोणतीही हिंसा वाढू नये यासाठी नवी मुंबई शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, काल मराठा कार्यकर्त्यांसोबत तरूण वर्गही रस्त्यावर उतरला होता. पनवेल हायवेवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या.

'चलो अयोध्या, चलो वारणसी', शिवसेनेची होर्डिंगबाजी

काल सकाळी सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद रात्रीपर्यंत पहायला मिळाले. नवी मुंबईतल्या कोरपखैराणे आणि घणसोली परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. अनेक दुकानं फोडण्यात आली. अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तर पोलिसांची चौकीदेखील आंदोलकांकडून फोडण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली पण या सगळ्यावर सुरक्षा म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आजही नवी मुंबईत आहे.

काल दिवसभरच्या आंदोलनानंतर अखेर मुंबईत बंद मागे घेण्यात आला. परंतू नवी मुंबईच्या पनवेलमध्ये आंदोलक रत्यावरच होते. पोलिसांनी अनेक वेळा आवाहन करूनही आंदोलक काही बाजूला होण्यासाठी तयार नव्हते. नवी मुंबईत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ केली. पोलिसांच्या 3 ते 4 गाड्या यात जाळण्यात आल्या. घणसोलीमध्ये बस फोडण्यात आल्या तर कोपरखैराण्यात टायर जाळून वाहतूक ठप्प करण्यात आली होती. ट

पाकिस्तानात सगळ्यात मोठी पार्टी ठरली इम्रान खानची 'तेहरीक-ए-इन्साफ'

त्यामुळे नवी मुंबईत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत आणि नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांकडून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर पोलिसांचा ताफाही तैनात केला आहे.

हेही वाचा...

'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी'

मराठा आंदोलनाबाबत राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं ?

दिवसभरात ‘या’ ठिकाणी पेटलं मराठा आंदोलन

First published: July 26, 2018, 8:57 AM IST

ताज्या बातम्या