मराठा क्रांती मोर्चाची मुंबईत निदर्शनं, विद्यार्थ्यांसह शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मराठा क्रांती मोर्चाची मुंबईत निदर्शनं, विद्यार्थ्यांसह शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर निदर्शने केली.

  • Share this:

मुंबई, 6 मे : आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर निदर्शने केली. त्यानंतर आता निदर्शनं करणारे विद्यार्थी आणि मराठा समाजाचं एक शिष्टमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलं आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मेडिकलच्या विद्यार्थांचा प्रश्न सोडवावा, यासाठी राज्यभरातून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी मुंबईत आले आहेत. मुंबई दाखल होताच त्यांनी निदर्शने करून राज्य सरकारला ईशारा दिला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. यावर काही उत्तर शोधलं जात का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षण लागू करण्यात आलं. मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येत नाही. कारण मराठा आरक्षण लागू होण्याआधी 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आल्याने त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा समाजातील तरुणांनी SEBC वर्गातून प्रवेश मिळवला आहे.

VIDEO: स्मृती इराणी रडक्या, नवज्योत सिद्धू यांचा टोला

First published: May 6, 2019, 2:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading