मुंबईत मराठा समाज आक्रमक, थेट प्लाझा थिएटरबाहेर करणार ठिय्या आंदोलन

मुंबईत मराठा समाज आक्रमक, थेट प्लाझा थिएटरबाहेर करणार ठिय्या आंदोलन

मुंबईत आज 20-25 ठिकाणी आंदोलन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. मराठ समाज आक्रमक होत अनेक ठिकाणी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. अशात आज मराठा समाजाने आज मुंबईच मोर्चा वळवला आहे. मुंबईत दादर इथल्या प्लाझा थिएटरबाहेर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

सकाळी 11 ते 1 आंदोलन केलं जाणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईत आज 20-25 ठिकाणी आंदोलन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

एका दिवसात समोर आले 92 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांचा आकडाही हजाराच्या वर

ठाकरे सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने नसल्याची टीका करत मराठा समाज आणि विरोधकांकडून जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील मराठा आरक्षणावर स्थगिती मिळाल्यानंतर, मराठा समाजामध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केवळ मराठा समाजाचा हा मतदानासाठी वापर का, असा प्रश्न तरुणांकडून विचारला जाऊ लागला आहे. अशात हिंगोली जिल्ह्यात तर अनेक गावांमध्ये, थेट राजकीय पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली असून गावाच्या बाहेरच बोर्ड लावून, गावात न येण्याचा इशारा, राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना देण्यात आला.

देश अनलॉक होत असताना या राज्याने जाहीर केली संचारबंदी, 11 जिल्हे राहणार बंद

"चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष", "आता मराठा आरक्षण ऐवढेच आमचं लक्ष" अशा आशयाचे फलक, हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांच्या बाहेर दिसू लागले आहेत. असाच एक बोर्ड औंढा तालुक्यात असलेल्या टाकळगव्हाण, या गावच्या लोकांनी गावाबाहेर लावला असून, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना, गावात येण्यास बंदी घातली आहे.

त्यामुळेच मराठा समाज आता अधिक आक्रमक झाला असून, पुढाऱ्यांना गावात येणे पासूनच मज्जाव केला जावू लागला आहे. सोबतच गावात आल्यास, "आपल्या जीविताला धोका झाल्यास, स्वतः जबाबदार" असल्याचा इशाराही मराठा समाजाला दिला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 20, 2020, 10:55 AM IST

ताज्या बातम्या