मराठा क्रांती मोर्चाचा ब्राह्मण मुख्यमंत्री असण्याला विरोध नाही - आयोजक

मराठा क्रांती मोर्चाचा ब्राह्मण मुख्यमंत्री असण्याला अजिबात विरोध नसल्याची स्पष्ट भूमिका मोर्चा आयोजकांनी आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत स्पष्ट केलंय. तसंच आरक्षणासाठी मागणीसाठी मुंबईत 9 ऑगस्टला होणारा मराठा क्रांती मोर्चा हा शेवटचा मोर्चा असेल.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2017 10:11 PM IST

मराठा क्रांती मोर्चाचा ब्राह्मण मुख्यमंत्री असण्याला विरोध नाही - आयोजक

मुंबई, 7 ऑगस्ट : मराठा क्रांती मोर्चाचा ब्राह्मण मुख्यमंत्री असण्याला अजिबात विरोध नसल्याची स्पष्ट भूमिका मोर्चा आयोजकांनी आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत स्पष्ट केलंय. तसंच आरक्षणासाठी मागणीसाठी मुंबईत 9 ऑगस्टला होणारा मराठा क्रांती मोर्चा हा शेवटचा मोर्चा असेल. आता यापुढे मोर्चे निघणार नाहीत तर आंदोलनं होतील. अशीही ठाम भूमिका मोर्चा आयोजकांनी स्पष्ट केलीय.

मुंबईत 9 ऑगस्टला क्रांती दिनाचं औचित्य साधून भव्य मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवरच आयबीएन लोकमतने मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांना स्टुडिओत निमंत्रित करून त्यांची भूमिका जाणून घेतली. या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चे नेमके कशासाठी काढला जातोय. मराठा समाजाला नेमकं कशासाठी आरक्षण हवंय. आंदोलनाची यापुढील दिशा नेमकी काय असेल, मराठा मोर्चांमुळे महाराष्ट्रात जातीयवाद वाढतोय का अशा, सर्वच विषयांवर साधकबाधक चर्चा झाली.

मराठा क्रांती मोर्चासंबंधीचा आमचा न्यूजरूम चर्चा हा संपूर्ण कायक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.youtube.com/watch?v=Roxf5I9htkg

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2017 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close