मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मराठा क्रांती मशाल मोर्चा : विश्वास नांगरे पाटील व विनायक मेटेंमध्ये चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय आंदोलन मागे घेणार नाही

मराठा क्रांती मशाल मोर्चा : विश्वास नांगरे पाटील व विनायक मेटेंमध्ये चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय आंदोलन मागे घेणार नाही

मराठा आरक्षणासाठी आंदोलन आक्रमक झालं आहे

मराठा आरक्षणासाठी आंदोलन आक्रमक झालं आहे

मराठा आरक्षणासाठी आंदोलन आक्रमक झालं आहे

    मुंबई, 7 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी (maratha Reservation) आक्रमक झालेला मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थळी निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हा मोर्चा वांद्रे पूर्व भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सध्या जमला आहे. यावेळी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishvas Nagre Patil) घटनास्थळी दाखल झाले आहेत व त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. 'एक मराठा लाख मराठा' म्हणत आज मराठा समाजाने वांद्रे पूर्व भागात मशाल मोर्चा काढला होता. हा मशाल मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackray) यांचे निवास्थान मातोश्रीवर निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हा मोर्चा वांद्रे पूर्व भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सध्या जमला आहे. येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी कार्यकर्ते निदर्शने करीत आहे. यावेळी विश्वास नांगरे पाटील आंदोलनस्थळी दाखल झाले असून मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या निर्णयावर मराठा आंदोलक ठाम आहे. हे ही वाचा-BIG NEWS: मुंबईत गेल्या 3 महिन्यातली सर्वात कमी रुग्णसंख्या, मृत्यूमध्येही घट कोरोनाबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विश्वास नांगरे पाटील आंदोलनस्थळी पोहोचले असले तरीही मराठा आंदोलक मोर्चा मागे घेण्यास तयार नाही.  सरकारचा प्रतिनिधी आल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले. यावेळी विश्वास नांगरे पाटील व विनायक मेटेंमध्ये चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब हे मराठा मोर्चाच्या 10 प्रतिनिधींची भेट घेणार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत मोर्चा मागे घेणार नसल्याचा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी घेतला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Maratha reservation, Mumbai, Udhav thackarey

    पुढील बातम्या