असं असेल मराठा समाजाचं जात प्रमाणपत्र!

असं असेल मराठा समाजाचं जात प्रमाणपत्र!

त्यासंदर्भात आज राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. तसंच या दोन्ही प्रमाणपत्र कसे असेल याचे नमुने प्रसिद्ध केले आहे.

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर :  मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या १६ टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने आता मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंदर्भात आज राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. तसंच या दोन्ही प्रमाणपत्र कसे असेल याचे नमुने प्रसिद्ध केले आहे.

मराठा समाजासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर कऱण्याची सुचना केली होती. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्य सरकारने एटीआर आणि विधेयक सादर करून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला. या विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केलं. त्यापाठोपाठ राज्यात 75 हजार जागांची मेगा भरती होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या मेगा भरतीत मराठा समाजाला या प्रवर्गाचे फायदे मिळावेत आणि आगामी मेगा भरतीत सोईचे व्हावे म्हणून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

=========================================

First published: December 7, 2018, 11:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading