मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'सेनेचे अनेक मंत्री नाराज, रिमोर्ट कंट्रोल दुसरीकडेच', चंद्रकांत पाटलांचा दावा

'सेनेचे अनेक मंत्री नाराज, रिमोर्ट कंट्रोल दुसरीकडेच', चंद्रकांत पाटलांचा दावा

'ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत नारायण राणे सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी जर छातीठोकपणे दावा केला असेल तर त्यात नक्की तथ्य असेल'

'ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत नारायण राणे सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी जर छातीठोकपणे दावा केला असेल तर त्यात नक्की तथ्य असेल'

'ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत नारायण राणे सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी जर छातीठोकपणे दावा केला असेल तर त्यात नक्की तथ्य असेल'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 22 ऑगस्ट : 'नारायण राणे (narayan rane) यांनी छाती ठोक सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. एकनाथ शिंदेच (eknath shinde) नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले लाल दिवा, कॅबिन, स्टाफ मिळतो पण या मंत्रिमंडळात रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे' अशी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

'नारायण राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत नारायण राणे सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी जर छातीठोकपणे दावा केला असेल तर त्यात नक्की तथ्य असेल. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत' असा दावाही पाटील यांनी केला.

पार्लरमध्ये डोळ्यांवर काकडी ठेऊन 20 मिनिटं बसली महिला, सोन्याची चेन झाली गायब

'वसईमध्ये हितेंद्र ठाकूर यांची भेट राजकीय नव्हती. राणेंसारखा एवढा मोठा नेता कोणाला भेटतो तर त्यांनी याचा अर्थ असा काढू नये. भाजपच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे', असंही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

'राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. हे सरकार किती वेळ चालेल माहीत नाही पण भाजपसोबत आलेल्या या सरकारमुळे दुखावलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही नक्की न्याय देऊ. पुढील निवडणुका या स्वबळावरच लढवू, सेना-भाजप सोबत येईल हा जर तर चा प्रश्न आहे. पण आम्ही स्वतंत्रच लढणार, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.

'मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे सरकारची भूमिका समजून घेतात म्हणता मग नांदेडचे आंदोलन हे भाजप पुरस्कृत होते, असे कसे म्हणता', असा टोलाही  चंद्रकांत पाटलांनी लगावला.

'मागास आयोगाचे काम सरकार सुरू का करत नाही?अशात आंदोलन करू नकास असे सरकार कसे म्हणू शकते, असा सवालही  पाटील यांनी अशोक चव्हाण यांना केला आहे.

रक्षाबंधनच्या दिवशी बीड हादरलं, पुन्हा एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार

'रावसाहेब दानवे हे ग्रामीण भागातील नेते आहेत. त्यांची ग्रामीण बोली भाषा आहे. मोदींबाबत त्यांनी केलेले वक्तव्याचा अर्थ हा अनादर करणे असा होत नाही, अशी सारवासारवही पाटील यांनी केली.

'मी भांडूपमधून येत असतांना किशोरी पेडणेकर यांच्या कार्यक्रमाला फटाके वाजवण्यासाठी किती गर्दी होती. अशा जन आशीर्वाद यात्रेतील गर्दीबाबत महापौर किशोरी पेडणेकर कशा बोलू शकतात, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

'यशोमती ठाकूर यांच्या प्रमाणेच अन्य मंत्र्यांची ही स्थिती आहे. सगळ्याच मंत्र्यांची गळचेपी होत आहे. अजित पवार यांच्याकडून आपल्या खात्याला निधी मिळत नसल्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विधानावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

First published: