मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

लवकरच मोठी भरती, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने दिले भाजपला खिंडार पाडण्याचे संकेत

लवकरच मोठी भरती, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने दिले भाजपला खिंडार पाडण्याचे संकेत

'गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटापेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत आणि त्यांना उबग आलेली आहे'

'गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटापेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत आणि त्यांना उबग आलेली आहे'

'गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटापेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत आणि त्यांना उबग आलेली आहे'

    मुंबई, 16 डिसेंबर : विधान परिषद निवडणुकीत (mlc election maharashtra 2020) राष्ट्रवादीने (NCP) घवघवीत यश मिळवल्यानंतर आता पुन्हा एकदा मेगाभरतीची चर्चा रंगली आहे. भाजपचे काही नेते आणि आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी सुद्धा 'लवकरच' भरती होईल, असे संकेत दिले आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपमध्ये गळती लागली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि बीडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला दणका दिला आहे. 'गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटापेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत आणि त्यांना उबग आलेली आहे,  त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल' असे संकेत जयंत पाटील यांनी दिले. उदयनराजे भोसले यांच्या एका दगडात दोन शिकार, 'या' मंत्र्यांवर केली जहरी टीका 'मेट्रो कारशेडच्या काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. त्यावर कोणतीही स्थगिती दिलेली नाही.  जर स्थगिती दिलेली असती तरी अंतिम सुनावणी बाकी आहे. आरेच्या भागात वन आहे त्या वन विरोधी जी लोकं आहेत. त्यांना उकळ्या फुटायची गरज नाही' असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. तसंच, 'मुंबईच्या जवळ वन असणे हे मुंबईकरांसाठी भाग्याचे आहे. तिथे प्रकल्प केले तर पर्यावरणाची हानी होते. सरकारने भूमिका घेतली त्यावर इतकं आकाडतांडव करण्याची गरज नाही. राजकीय हितासाठी काहीजण आरोप करत आहेत तर काही राजकारणासाठी करत आहे'  असा टोलाही पाटील यांनी भाजपला लगावला. 'दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती. हातातोंडशी आलेले पिकं वाया गेले.  केंद्र सरकारला आम्ही सतत मागणी केली की, केंद्रच पथक पाठवावे.  आता संकट सावरल्यावर टीम येते म्हणजे केंद्राचा राज्याकडे पाहण्याचा दुजाभाव आहे',  अशी टीकाही पाटील यांनी केली. तसंच,  'संकट आल्यावर पवार साहेब केंद्रीय मंत्री असताना लगेच टीम यायची, राज्याला मदत मिळायची. आज मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते, विशेषतः महाराष्ट्राबाबत दुजाभाव करत आहेत' असा आरोपही पाटील यांनी केला. अजित पवार यांनीही केला दावा दरम्यान, हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरून झालेल्या चर्चेत अजित पवार बोलत असताना 'भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचा दावा त्यांनी केला होता. अजित पवार म्हणाले, 'राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपला जनतेनं सपशेल नाकारलं आहे. धुळे-नंदुबारमध्ये भाजपचे उमेदवार अमरिश पटेल हे विजयी ठरले. पटेल हे आमच्याकडून तिकडे गेले आहेत. ते आणि आम्ही समविचारी आहेत. त्यामुळे ते कधी घरवापसी करतील हे, भाजपला कळणारही नाही, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. भाजपचा गड समजला जाणाऱ्या नागपूर आणि पुण्यात मात्र महाविकास आघाडीनं मोठं खिंडार पाडलं आहे. पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. ही बाब भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, याबाबत भाजपनं आत्मचिंतन करावं, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या