विश्वसुंदरी मानुषीचं मुंबईत जंगी स्वागत

विश्वसुंदरीचा मान पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर भारतात परतली आहे. काल रात्री उशिरा तिचं मुंबई विमानतळावर आगमन झालं त्यावेळी तिच्या चाहत्यांनी विमानतळावर एकच गर्दी केली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2017 02:38 PM IST

विश्वसुंदरी मानुषीचं मुंबईत जंगी स्वागत

26 नोव्हेंबर : विश्वसुंदरीचा मान पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर भारतात परतली आहे. काल रात्री उशिरा तिचं मुंबई विमानतळावर आगमन झालं त्यावेळी तिच्या चाहत्यांनी विमानतळावर एकच गर्दी केली.

अनेक तासांपासून तिचे चाहते तिचे फोटो आणि पोस्टर्स घेऊन वाट पाहत होते. त्यामुळे मानुषीचं आगमन होताच विमानतळावर काही काळ गोंधळ उडाला.

मानुषीचं ज्याप्रकारे स्वागत झालं त्यामुळे तिला भरून आलं.  तिनं ट्विटवर आपल्या चाहत्यांचे आभार मानत देवाचेही आभार मानले. त्यानंतर मानुषी हैद्राबादला एका चर्चासत्राकरता उपस्थिती लावणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2017 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...