माझी आई माझा आदर्श - मानुषी छिल्लर

माझी आई माझा आदर्श - मानुषी छिल्लर

आज मुंबईत तर तिचं खास स्वागत करण्यात आलं. आज मुंबईत, 'निलांबरी' या ओपन बसमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

  • Share this:

02 डिसेंबर : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं देशभरात कौतुक होतंय. आज मुंबईत तर तिचं खास स्वागत करण्यात आलं. आज मुंबईत, 'निलांबरी' या ओपन बसमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

ओपन बसमधून मुंबईकरांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर मानुषी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना भेटली. यावेळी तिनं बच्चेकंपनीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली.

यावेळी एका विद्यार्थ्याने मानुषीला तुमचं आदर्श कोण आहे असा प्रश्न विचारला. त्यावेळी मानुषीने माझी आई असल्याचं उत्तर दिलं. तसेच विद्यार्थ्यांनी मानुषीचं गाणं  गाऊन आणि डान्स करून स्वागत केलं. मिस वर्ल्ड मानुषीसोबत फोटो काढण्यासाठीही सर्वांनी यावेळी गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 03:13 PM IST

ताज्या बातम्या