मुंबई, 11 डिसेंबर : मंत्रालयात काम करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि कंत्राट कर्मचाऱ्यांना पोषाखाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. या नव्या सूचनेनुसार मंत्रालयात आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसंच मंत्रालयात स्लीपर्स वापरू नये, असंही नव्या नियमांत म्हटलं आहे.
महिलांनी साडी, सलवार चुडीदार, पॅन्ट, ट्राउझर आवश्यकता असल्यास दुपट्टा घालवा. तर पुरुषांनी शर्ट पॅन्ट, ट्राउझर घालावे, असं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद करण्यात आलं आहे.
आणखी काय आहेत पोषाखाबाबत सूचना?
- गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करू नये
- आठवड्यातील एक दिवस शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावे
- जीन्स आणि टी शर्ट घालू नये
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महिलांच्या पोषाखाबाबत शिर्डीतील साई संस्थानकडूनही नवी नियमावली जारी करण्यात आली होती. साई संस्थानच्या या निर्णयानंतर मोठं वादंगही निर्माण झालं होतं. हा वाद ताजा असतानाच आता मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या पोषाखावरून शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.