मुंबई, 21 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (mansukh hiren death case) महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) एका बुकीला आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनुसख हिरेन यांना स्फोटकांनी भरलेल्या गाडीबद्दल कट लक्षात आला होता म्हणून खून करण्यात आला, असा संशय ATS ने व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. बुकी नरेश गोर आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.
IND vs ENG : विराटचा एक निर्णय, बड्या खेळाडूंसाठी ठरणार धोका
एटीएसने या दोघांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. स्फोटकांनी भरलेली गाडी संबंधीच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली असावी, असं ATS ने कोठडी अहवालात नमुद केले आहे. मनसुख यांन कटा व्यतिरिक्तची माहिती कळाली होती. त्यामुळेच त्यांची हत्या करण्याचा कट रचला गेला. पण, त्यांच्या मृत्यू ही आत्महत्या दाखवण्याचा कट होता. पण, त्यांची हत्या कशी केली त्याकरता काय केले हे गुढ अजूनही कायम आहे.
ATS च्या कोठडी अहवालात धक्कादायक खुलासे
1) विनायक शिंदे आणि नरेश गोर 2 आरोपींना अटक तर एक पाहिजे आरोपी त्याचे नाव आहे सचिन वाझे
2) आरोपींकडून 3 मोबाईल मिळाले आहेत
3) व्होडाफोन कंपनीचे 8 सिमकार्ड मिळाले असून 8 ही सिमकार्ड गुजरात राज्यातील आहेत
4) हे 8 ही सिमकार्ड नरेश गोर याने विनायक शिंदे आणि सचिन वाझेला दिले होते
5) गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी जप्त करणे बाकी आहे
6) गुन्ह्यासाठी वापरलेले मोबाईल शोधून जप्त करणे बाकी आहे
7) हिरेन यांच्या अंगावरील सोन्याची चैन, पुष्कराज खडा असलेली अंगठी, मनगटी घड्याळ, पैशांचे पाकीट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड जप्त करणे बाकी आहे
8) गुन्ह्याचा कट कुठे रचला? त्यात कोण कोण शामिल होते? खून कुठे केला? विल्हेवाट कुठे लावली? याचा शोध घेणे बाकी आहे.
9) स्फोटकांची गाडी आणि हिरण याचा खून या दोन्ही गुन्ह्याचा एकमेकांशी संबंध काय आहे ते शोधणे बाकी आहे
विनायक शिंदे भेटायचा सचिन वाझेंना!
मे 2020 मध्ये विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेर आला होता. तब्बल वर्षभर विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेरच होता. फेब्रुवारी 2021 मध्ये विनायक शिंदे मुंबई पोलीस आयुक्तालयात आला होता. सचिन वाझे यांची त्याने भेट घेतली होती. दोघांमध्ये दोन तास बैठक चालली होती. तसंच सचिन वाझेच्या CIU कार्यालयात सुद्धा विनायक शिंदे भेटायचा. विनायक शिंदेने सचिन वाझेच्या केबिन बाहेरील पोलिसांकडून पोलीस लोगोचे मास्क आणि पोलीस लिहलेली निळी पट्टी मागितली होती.
दिलासादायक बातमी! होळीपूर्वी खाद्यतेलाच्या किमतीत होणार घट, वाचा किती होणार फरक
सचिन वाझेनंतर विनायकने मुंबई पोलीस आयुक्तालयातील एका मोठ्या अधिकाऱ्याची देखील भेट घेतली होती. तो वरीष्ठ अधिकारी कोण आहे? हे अद्याप समोर येऊ शकले नाही.
तसंच, विनायक शिंदे आणि सचिन वाझेची ठाण्यातही भेट झाली होती. या कटामध्ये इतरही पोलीस अधिकाऱ्यांचा या कटात सहभाग आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
कोण आहे विनायक शिंदे?
- विनायक शिंदे हा लख्खन भैय्या बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आहे
- विनायक शिंदे लख्खन भैया बनावट चकमकीतील मुख्य आरोपी प्रदिप सुर्यवंशी याचा खास होता
- बनावट चकमक प्रकरणी विनायक शिंदे याला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिलीये
- प्रदीप सुर्यवंशी, विनायक शिंदे हे सचिन वाझे याचे एकदम खास आहेत
- सचिन वाझे याने प्रदीप सुर्यवंशी आणि विनायक शिंदे यांच्या सोबत अंधेरी CIU युनिट मध्ये एकत्र काम केलंय
- तावडे नावाने मनसुख हिरेन यांन फोन करणारा विनायक शिंदे असल्याचे बोलले जात आहे
- यांच्यासोबत आणखी 4 जण होते
- सचिन वाझे याच्या सांगण्यावरून विनायक शिंदेने एक बुकी आणि इतर आरोपींची जुळवा जुळव केल्याचा ATS ला संशय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.