मी सीडीआर मिळवला, माझी खुशाल चौकशी करा, फडणवीसांचे ठाकरे सरकारला खुले चॅलेंज

मी सीडीआर मिळवला, माझी खुशाल चौकशी करा, फडणवीसांचे ठाकरे सरकारला खुले चॅलेंज

'सचिन वझे यांचा राजीनामा नाही. वाझे कोणत्या पक्षाचे आहेत ? वाझेला निलंबित करा'

  • Share this:

 मुंबई, 09 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren death case) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (maharashtra budget session 2021) महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 'या प्रकरणाची चौकशी एटीएस करत आहे, तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली. त्यानंतर 'सचिन वाझे (Sachin waze) यांना गृहमंत्रीच पाठीशी घालत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. तसंच, मी फोनचा सीडीआर मिळवला आहे, माझी खुशाल चौकशी करा, असं चॅलेंजच फडणवीस यांनी दिले.

मनसुख हिरेन प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन सादर केले. यावेळी,  'मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावर खुलासा करत गृहराज्यमंत्री प्रफुल्ल खेडा पटेल यांचा नावाचा उल्लेख केला. या प्रकरणी एसआयटी स्थापन करत असल्याची घोषणा देशमुख यांनी केली. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे, जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं सांगितले.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला.

'एखाद्या व्यक्तीला किती मागे घालावे. सचिन वझे यांचा राजीनामा नाही. वाझे कोणत्या पक्षाचे आहेत ? वाझेला निलंबित करा. कारवाई करणे नाही म्हणजे वाझेंना पुरावे नष्ट करण्याची मुभा देण्यासारखे आहे. वाझे यांना निलंबित करा, हा खरा चेहरा दिसतोय', असा आरोप फडणवीस यांनी केला.

चीनच्या सायबर हल्ल्यानंतर भारताचं नवं धोरण, सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल

'कोणत्याही पक्षाचा गुन्हेगार नसतो, वाझेला पहिले निलंबित करा. हायकोर्टाचा आदेशाने वाझे निलंबित झाले, आम्ही आमचा सरकारने त्यांना सेवेत घेतले नव्हतं, यांच्या एका पुनर्विचार समितीने त्यांना घेतलं', असंही फडणवीस म्हणाले.

त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

'मुळात या प्रकरणात कोणतीही याचिका दाखल केली नाही. त्यामुळे न्यायप्रविष्ट नाही. यांना अभिमान वाटतो की लोकं इथे येऊन आत्महत्या करतात. पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं. इतके पुरावे देऊन काही कारवाई होत नसेल मग आम्हाला तुमच्यावर संशय आहे', असा आरोपच फडणवीस यांनी केला.

आताच्या आता वाझे यांना निलंबित करा आणि अटक करा', अशी मागणी करत  भाजपचे आमदार जागेवरुन उठले आणि गृहमंत्री हाय हायच्या घोषणा दिल्या.

VIDEO: नियम न पाळल्यास अंशतः लॉकडाऊनचा करण्याचा पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा

'विरोधी पक्षाकडे सीडीआर कुठून आणलं, त्यांना काय अधिकार आहे, विरोधी पक्षनेत्यांना सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे का ? असा  सवाल नाना पटोले यांनी केला.

'होय, मी सीडीआर मिळवला माझी चौकशी करा, पण जे खुनी आहेत त्यांची चौकशी करा. आम्हाला धमक्या देतायंत का? खुनी मिळाला नाही तर त्या पलीकडचीही माहिती काढेल', असं आव्हानच फडणवीस यांनी दिले.

हे सरकार खुनी आहे असं म्हणत भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर सत्ताधारी आमदारही वेलमध्ये उतरले आणि त्यांनीही गोंधळ घातला.

Published by: sachin Salve
First published: March 9, 2021, 2:40 PM IST

ताज्या बातम्या