मुंबई लोकलमध्ये भामटेगिरी सुरूच, गुटखा खाऊन गर्दुला थुंकला तरुणीच्या अंगावर

मुंबई लोकलमध्ये भामटेगिरी सुरूच, गुटखा खाऊन गर्दुला थुंकला तरुणीच्या अंगावर

मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलमधील अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट : मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलमधील अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. तरुणी लोकल पकडत असताना एक गर्दुला गुटखा खाऊन अक्षरशः तिच्या अंगावर थुंकल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (23 ऑगस्ट) रात्री 10.50 वाशी स्टेशनवर ही घटना घडली. पीडित तरुणी नेरुळ येथील राहणारी आहे. वाशीहून पनवेलकडे जाताना लोकलमध्ये तिच्यासोबत हा प्रकार घडला. तिने भामट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

तरुणी वाशीहून पनवेलकडे जाण्यास निघाली. गर्दुल्ला वाशीच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील लोकलमध्ये चढला गर्दुल्ल्याने तरुणीच्या पाठीमागून येत तिच्या अंगावर गुटखा थुंकला. यावेळी लोकल सानपाडा स्टेशनला आली होती. त्यावेळी तरुणीने आरडाओरडा करून त्या गर्दुल्ल्याला पकडा, अशी विनंती इतर प्रवाशांना केली. काही लोकांनी त्याला पकडून चोपही दिला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत पीडित तरुणीने फेसबुक पोस्ट लिहून एक व्हिडीओही शेअर केला आहे.

उद्या तुमच्या आई-बहिणीसोबत असं घडू नये...

'आज माझ्यासोबत घाणेरडा प्रकार घडला. उद्या तुमच्या आई-बहिणीसोबत असं घडू नये, असं वाटत असेल तर प्लीज हा व्हिडीओ शेअर करा. आवाज उठवायला हवा नाही तर स्त्री माता नाही कचऱ्याची पेटी होईल. अशा विकृत माणसांच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे,' अशी पोस्ट तरुणीने फेसबुकवर शेअर केली आहे.

दरम्यान महिला प्रवाशांच्या डब्यात घुसून एका भामट्याने हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. एका प्रवासी महिलेने या प्रकराचे चित्रीकरण करून हा व्हिडिओ 'ट्विटर'वर पोस्ट केला होता.

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: August 26, 2019, 11:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading