मनोरा आमदारनिवास 2 महिन्यात रिकामे करणार

धोकादायक झालेलं मुंबईतील मनोरा आमदार निवास हे दोन महिन्यात रिकामे केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांना पर्यायी जागा घाटकोपर इथल्या म्हाडाने बांधलेल्या सरकारी निवासी संकुलात दिली जाणार आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2017 10:13 PM IST

मनोरा आमदारनिवास 2 महिन्यात रिकामे करणार

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 12 सप्टेंबर : धोकादायक झालेलं मुंबईतील मनोरा आमदार निवास हे दोन महिन्यात रिकामे केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांना पर्यायी जागा घाटकोपर इथल्या म्हाडाने बांधलेल्या सरकारी निवासी संकुलात दिली जाणार आहे. आज विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दोन महिन्यानंतर मनोरा आमदार निवासामधील चारही विंग पाडल्या जाणार आहेत. तर मनोराच्या जागी नवीन आमदार निवास बांधण्याबाबत आराखडा तयार अंतिम करत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. आमदारांसाठी मुंबईत निवासाकरता नरिमन पॉईंट इथल्या मोकळ्या जागेत टोलेजंग मनोरा आमदार निवास बांधण्यात आले होते. यामध्ये 158 आमदारांचे निवासस्थान आहे. प्रत्येक आमदाराला सुमारे 300 चौरस फूटपेक्षा मोठ्या दोन सदनिका देण्यात आल्या आहेत. मात्र अवघ्या 25 वर्षात या मनोरा आमदार निवासामध्ये अनेक समस्या पुढे यायला सुरुवात झाली.

प्लास्टर निघणे, स्वच्छतागृहातमध्ये पाणी गळती पासून अनेक समस्या पुढे आल्या. त्यातच इमारतीच्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'मध्येही इमारत दुरुस्त करणे अवघड असल्याचं समोर आलं. या मनोरा आमदार निवासाचा मुदा पावसाळी अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे मनोरा आमदार निवास नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 10:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...