काँग्रेसचे दिवंगत नेते मनोज म्हात्रेंच्या पत्नी वैशाली म्हात्रे विजयी

काँग्रेसचे दिवंगत नेते मनोज म्हात्रेंच्या पत्नी वैशाली म्हात्रे विजयी

वैशाली म्हात्रे या प्रभाग क्रमांक 20 ब मधून विजयी झाल्यात.

  • Share this:

26 मे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या पत्नी वैशाली म्हात्रे विजयी झाल्यात.

15 फेब्रुवारीला मनोज म्हात्रे यांची गोळ्या घालून आणि तलवारीनं वार करून निर्घृण हत्या केली होती. या हत्येप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ मयुर ऊर्फ कोको प्रकाश म्हात्रे, महेश पंडित म्हात्रे यांना अटक करण्यात आलीये. मनोज म्हात्रे यांच्या हत्येमुळे भिवंडी ढवळून निघाली होती. त्यांच्या पत्नी वैशाली यांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे जपत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.  वैशाली म्हात्रे या

प्रभाग क्रमांक 20 ब मधून विजयी झाल्यात. मात्र, या विजयासाठी त्यांना चांगलीच लढत द्यावी लागली. अवघ्या 150 मतांनी त्यांचा विजय झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2017 05:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading