मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

आशिष शेलार यांनी दोन टर्म अध्यक्षपद सांभाळलं. त्यामुळे नव्या नेत्याची भाजपला नियुक्ती करावी लागणार आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 21 मे : लोकसभेच्या निवडणुका झाल्याने आता निकालाची प्रतिक्षा असली तरी सर्वच पक्षांमध्ये फेरबदलाला सुरुवात झालीय. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बदल होणार असल्याचे संकेत आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची अध्यक्षपदाची मुदत संपत असल्याने त्यांच्या जागी नव्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांची दुसरी टर्म पुढच्या महिन्यात संपणार आहे. पक्षाच्या घटनेनुसार एकाच व्यक्तीला तिसऱ्यांदा अध्यक्षपद देता येणार नसल्यानं शेलार यांच्या जागी पर्यायी नावांवर विचार करण्यात येतोय.

मनोज कोटक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्यानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनोज कोटक सध्याचे बीएमसीतले भाजपचे गटनेते आहेत. त्याचबरोबर ते भाजपचे ईशान्य मुंबईतले लोकसभा उमेदवारही आहेत. या जागेवर किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेने प्रखर विरोध केला होता. त्यामुळे त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर मनोज कोटक यांना उमेदवारी दिली गेली.

आशिष शेलार यांनी दोन टर्म अध्यक्षपद सांभाळलं. शिवसेना आणि राज ठाकरे यांना अंगावर घेण्याचं काम त्यांनी समर्थपणे सांभाळलं. ट्विटरच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षही त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. लोकसभेच्या प्रचारात राज ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत असताना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आशिष शेलार यांनीच राज ठाकरेंना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर देण्याचं काम केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 04:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading