S M L

मुंबई कुणाची ? मनोज कोटक VS संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईत वेगळी लढत

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारल्यामुळे यावेळी ईशान्य मुंबईची लोकसभा निवडणूक सगळ्यात जास्त गाजली. भाजपतर्फे त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमधली ही एकमेव जागा. इथून संजय दिना पाटील हेच पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

Updated On: Apr 25, 2019 08:09 PM IST

मुंबई कुणाची ? मनोज कोटक VS संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईत वेगळी लढत

विवेक कुलकर्णी

मुंबई, 25 एप्रिल : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारल्यामुळे यावेळी ईशान्य मुंबईची लोकसभा निवडणूक सगळ्यात जास्त गाजली. भाजपतर्फे त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. घाटकोपर, मुलंड, कांजुरमार्ग याठिकाणी गुजराथी मतदारांचं प्रमाण जास्त आहे. मनोज कोटक गुजराथी असल्याने त्याचा फायदा त्यांना इथे मिळू शकतो.

भाजपची ताकद जास्त


या मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमधली ही एकमेव जागा. इथून संजय दिना पाटील हेच पुन्हा निवडणूक लढवत आहेत.मागच्या निवडणुकीतही संजय दिना पाटील हेच इथून लढले होते. मोदी लाटेमध्ये त्यांचा जोरदार पराभव झाला आणि किरीट सोमय्या निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्यासमोर भाजपचा नवा उमेदवार आहे.

मनसेचं प्राबल्य

ईशान्य मुंबई मतदारसंघात भांडुप, मुलुंड अशा भागात मनसेचं प्राबल्य आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भांडुपला झालेली सभा आघाडीसाठी किती फायद्याची ठरेल हे पाहावं लागेल. राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याचा फटका या मतदारसंघात भाजपला जास्त बसू शकतो पण त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

Loading...

वाहतूक आणि सुरक्षा

दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हानही भाजपसमोर आहे.

==============================================================================================

VIDEO : 'दार तोडून घरात आले आणि माझ्या भाच्याला, भावजईला मारलं'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 08:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close