S M L

मनोहर पर्रीकरांची प्रकृती खालावली, लिलावती रुग्णालयात दाखल

Updated On: Aug 24, 2018 03:23 PM IST

मनोहर पर्रीकरांची प्रकृती खालावली, लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई, 24 ऑगस्ट : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमेरिकेहून यशस्वी उपचार घेऊन आल्यानंतर पर्रीकर कामावर रुजू होणार होते पण काल रात्री अचानक त्यांना स्वादूपिंडाचा त्रास होऊ लागला, त्याचबरोबर  त्यांना खूप उलट्याही होत होत्या त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मागील तीन महिन्यापासून पर्रिकरांवर अमेरिकेत स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार सुरू होते. पर्रिकरांवरचे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं अमेरिकी डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर ते भारतात परत आले होते. यानंतर ते त्यांच्या कामकाजाला सुरूवात करणार होते. पण काल रात्री पुन्हा स्वादुपिंडाचा त्रास होऊ लागला. अद्यार लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी पर्रीकरांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

लघुशंकेला गेलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांना अटक

मार्च महिन्यातही 62 वर्षांच्या मनोहर पर्रिकरांना लिलावती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले. त्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते आणि आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काल रात्री मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 03:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close