मानखुर्द स्टेशनबाहेर भरदिवसा पतीचा पत्नीवर चाकू हल्ला, लोकं फक्त पाहत होती !

भरदिवसा पतीने पत्नीवर हल्ला केला तेव्हा लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या महिलेच्या मदतीला कोणीही धावून आले नाही.

Sachin Salve | Updated On: Mar 6, 2018 06:06 PM IST

मानखुर्द स्टेशनबाहेर भरदिवसा पतीचा पत्नीवर चाकू हल्ला, लोकं फक्त पाहत होती !

मुंबई, 06 मार्च : मानखुर्द रेल्वे स्टेशन बाहेर भरदिवसा पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडलीये. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे.

धक्कादायक म्हणजे भरदिवसा पतीने पत्नीवर हल्ला केला तेव्हा लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या महिलेच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. हा सगळा प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला.

मानखुर्दमधील विजय इंगळे याने हे कृत्य केलं असून पोलिसानी त्याला अटक केली आहे. विजयची पत्नी गेल्या काही दिवसापासून त्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या आईवडीलांकडे राहू लागली. त्यांच्यात नेहमी वाद होत होते. ही महिला नवीमुंबईत स्टेट बँकेत कामाला आहे. तर विजय हा एका खासगी कंपनीत कामाला आहे.

गेल्या आठवड्यात विजय याने सकाळीचं मानखुर्द स्टेशन परिसरात आपल्या पत्नीवर रागाच्या भरात चाकूने हल्ला केला. दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नव्हतं पती तिच्यावर संशय घेत होता. म्हणूनच त्याने हा हल्ला केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2018 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close