मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी स्वाती साठेंच्या निलंबनासाठी विरोधक आक्रमक

मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी स्वाती साठेंच्या निलंबनासाठी विरोधक आक्रमक

मंजुळा शेट्येप्रकरणी कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या निलंबनावरून विरोधक आज विधान परिषदेत चांगलेच आक्रमक झाले. याप्रकरणी आरोपींना वाचवू पाहणाऱ्या स्वाती साठेंना सहआरोपी करण्याची मागणीही विरोधकांनी सभागृहात केली.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : मंजुळा शेट्येप्रकरणी कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या निलंबनावरून विरोधक आज विधान परिषदेत चांगलेच आक्रमक झाले. याप्रकरणी आरोपींना वाचवू पाहणाऱ्या स्वाती साठेंना सहआरोपी करण्याची मागणीही विरोधकांनी सभागृहात केली. सरकारने मात्र, सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशीचं आश्वासन देत स्वाती साठेंना निलंबित करण्यास ठाम नकार दिला. मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी भायखळा जेलचे प्रभारी कारागृह अधिक्षक तानाजी घरबुडवे आणि इंदूलकर यांना निलंबित केलं असून याप्रकरणी आतापर्यंत 102 कैदी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवल्याचं सभागृहाला सांगितलं. स्वाती साठे यांची चौकशी महानिरिक्षक स्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी सुरू आहे. तसंच 'सायबर लॉ'च्या आधारेही स्वाती साठे यांची चौकशी सुरू असून त्या दोषी आढळल्या तर स्वाती साठे यांच्यावर देखील कारवाई करू, असं आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.

मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा भायखळा तुरूंगात जेलर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी पोलिसांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी स्वाती साठेंनी व्हॉट्सअप ग्रुपवरून आपल्याच सहकाऱ्यांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. यावरून बरीच टीकाही झाली होती. म्हणूनच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात तुरुंग उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या निलंबनासाठी आक्रमक होत या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करण्याचीही मागणी केलीय

First published: August 1, 2017, 6:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading