मंजुळा शेट्येचा मृत्यू लपवणाऱ्या राजवर्धन सिन्हांकडेच तपासाची सूत्र

मंजुळा शेट्येचा मृत्यू लपवणाऱ्या राजवर्धन सिन्हांकडेच तपासाची सूत्र

कारण ज्या आयजी राज्यवर्धन सिन्हा यांच्याकडे मंजुळाच्या मृत्यूचा तपास देण्यात आलाय त्या राज्यवर्धन सिन्हा यांच्यावर मंजुळाच्या मृत्यूची बातमी लपवण्याचा आरोप आहे.

  • Share this:

07 जुलै : भायखळा जेलमधील महिला वॉर्डन मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूचा तपास गृहविभागाला मनापासून करायचा आहे की नाही असा प्रश्न पडतोय. कारण ज्या आयजी राजवर्धन सिन्हा यांच्याकडे मंजुळाच्या मृत्यूचा तपास देण्यात आलाय त्या राज्यवर्धन सिन्हा यांच्यावर मंजुळाच्या मृत्यूची बातमी लपवण्याचा आरोप आहे.

भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्ये या महिलेला ब्रेड आणि अंडीच्या हिशेबावरून जेल अधिकारी मनीषा पोखरकरसह बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणेने  यांनी तिला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत मंजुळाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता नवनवीन खुलासे होत आहे. मंजुळाची मृत्यूची बातमीच लपवण्याचा प्रयत्न केला गेलाय असा आरोपच तुरूंग पोलीस महानिरीक्षक  राजवर्धन सिन्हा यांच्यावर झालाय.  विशेष म्हणजे मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा तपास राज्यवर्धन सिन्हांकडे आहे.  त्यामुळे तपासअधिकारी बदलण्याचा सरकारचा हेतू शुद्ध आहे का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय.

दरम्यान, मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सहा जेल कर्मचाऱ्यांना मदत केल्याच्या प्रकरणात कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठेंकडून चौकशी काढून घेण्यात आलीये. मंजुळा शेट्येची तुरुंगात हत्या झाल्यानंतर सहा जेल कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. ह्या प्रकरणाची चौकशी स्वाती साठेंकडे देण्यात आली. पण त्यानंतर आरोपींच्या मदतीसाठीच चौकशी अधिकारी ह्या इतर कर्मचाऱ्यांना मदत करत असल्याचं त्यांच्याच व्हॉटस अप ग्रुपवरून उघड झालं.

First published: July 7, 2017, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading