मंजुळा शेट्येचा खूनच, मुंबई क्राईम ब्रँचच्या आरोपपत्रात स्पष्ट

याआधारे तपास केला असता जेल अधीक्षक मनीषा पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या ६ जेल पोलिसांनी हेतुपुरस्सर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2017 04:04 PM IST

मंजुळा शेट्येचा खूनच, मुंबई क्राईम ब्रँचच्या आरोपपत्रात स्पष्ट

मुंबई, 26 सप्टेंबर : भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येचा जाणीवपूर्वक खूनच केला होता, असं क्राईम ब्रँच तपासात समोर आलं आहे. साक्षीदार आणि  पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट झाल्याचे मुंबई क्राईम ब्रँचने आपल्या आरोपपत्रात नमुद केलंय.

२३ जूनच्या रात्री मंजुला शेट्ये या महिला कैदीला अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच यातच तिचा मृत्यू झाला. पण ही मारहाण करणारे महिला जेल पोलीस यांना पूर्ण कल्पना होती की आपण जे कृत्य करतोय त्यामुळे एखादी बेकायदेशीर घटना घडू शकते.  असं असतानाही मंजुळाला मारहाण करण्यात आली. ती तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच असं आरोपपत्रात नमुद करण्यात आल्याचे क्राईम ब्रँच सूत्रांनी सांगितलंय.

याआधारे तपास केला असता जेल अधीक्षक मनीषा पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या ६ जेल पोलिसांनी हेतुपुरस्सर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...