मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी साठेंबाबतचा चौकशी अहवाल शासनाकडे सुपूर्द

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी साठेंबाबतचा चौकशी अहवाल शासनाकडे सुपूर्द

स्वाती साठ्येंबाबतचा चौकशी अहवाल विधान परिषदेत लेखी सादर करण्यात आलाय. मंजुळा शेट्येचा भायखळा जेलमध्ये २४ जूनला मृत्यू झाला होता.

  • Share this:

13 डिसेंबर : भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी साठेंबाबतचा चौकशी अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता स्वाती साठेंवर कारवाई होणार का असा सवाल केला जातोय.

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी आरोपींच्या बचावासाठी मदत केल्याचा ठपका स्वाती साठेंवर ठेवण्यात आलाय. याबाबत चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं ९ ऑगस्ट २०१७ ला समिती स्थापन करण्यात आली. राज्य सरकार स्वाती साठेंना पाठीशी घालत असल्याची टीकाही करण्यात आलीये.

स्वाती साठ्येंबाबतचा चौकशी अहवाल विधान परिषदेत लेखी सादर करण्यात आलाय. मंजुळा शेट्येचा भायखळा जेलमध्ये २४ जूनला मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांच्या मारहाणीनंतर मंजुळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी आणि पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली होती. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसंच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

First published: December 13, 2017, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading