मंजुळाचा अपघाती मृत्यू दाखवून प्रकरण संपवू पाहता काय?, कोर्टाने सरकारला फटकारलं

मंजुळाचा अपघाती मृत्यू दाखवून प्रकरण संपवू पाहता काय?, कोर्टाने सरकारला फटकारलं

या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी घेण्याची मागणीही कोर्टाने फेटाळून लावली.

  • Share this:

31 जुलै : मंजुळा शेट्येचं अपघाती मृत्यू झाल्याचं दाखवून तुम्ही प्रकरण संपवू पाहताय का ? असा संतप्त सवाल करत हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय. तसंच या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी घेण्याची मागणीही कोर्टाने फेटाळून लावली.

आम्ही जे गेल्या सुनावणीत बोललो ते तुम्ही लिहून दिलंत, आम्हाला केसचा इतिहास नको, गेल्या सुनावणीपासून आतापर्यंत काय झालं ते सांगा, असंही कोर्टानं सुनावलं. त्याचबरोबर जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टर विश्वास रोकेला निलंबित केले गेलं नसल्याची राज्य सरकारनं धक्कादायक कबुलीही दिली. याउलट निलंबित केलं नसेल तर मग मीडियासोमर लोकांसमोर जाऊन निलंबित केल्याचं सांगण्याचा उद्देश्य काय ? असा संतप्त सवालही हायकोर्टानं विचारलाय.

तसंच न्यायदंडाधिकाऱ्यांना कोणतेच पुरावे दिल्या गेले नाहीयेत, जी गोष्ट न्यायदंडाधिकाऱ्यांना २४ तासात कळवणे अपेक्षित होतं ती खूप उशिरा कळवण्यात आली असंही हायकोर्टाने सुनावलं.

First Published: Jul 31, 2017 06:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading