S M L

मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणाशी माझा संबंध नाही -स्वाती साठे

या प्रकरणात आपण कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केलेला नाही आणि कोणताही पुरावा नष्ट केला नसल्याचंही साठे यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.

Sachin Salve | Updated On: Sep 19, 2017 09:12 PM IST

मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणाशी माझा संबंध नाही -स्वाती साठे

19 सप्टेंबर : मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसून आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि हेतुपुरस्सर असल्याचा दावा पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात केला आहे.

या प्रकरणात स्वाती साठे यांच्यासह जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने, कारागृह अधिक्षक चंद्रमणी इंदुलकर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी मंजुळाची सहकैदी मरियम शेख यांनी कोर्टात केली आहे, त्याला साठे यांनी लेखी उत्तर दिलं आहे.

या प्रकरणात आपण कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केलेला नाही आणि कोणताही पुरावा नष्ट केला नसल्याचंही साठे यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. माझी आणि डाॅ. तात्याराव यांची कोणतीही ओळख नाही, मी या प्रकरणाबदद्ल त्यांच्याशी कोणताही संपर्क साधला नाही असं साठे यांनी म्हटलं आहे.

साठे यांच्या पोलिसांच्या एका व्हाॅट्सअॅप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टमुळे गदारोळ निर्माण झाला होता पण आपण केवळ निष्पक्ष चौकशी करण्यात यावी असं इतकंच म्हणाले होते असाही दावाही साठे यांना आहे.

मी या प्रकरणात कोणताही अहवाल तयार करुन राज्य महिला आयोगाला दिलेला नाहीये असंही साठे यांनी सांगितलंय. स्वाती साठे यांच्यासह डॉ. तात्याराव लहाने आणि भायखळा जेलचे जेलर इंदुलकर यांनीही आज कोर्टात हजेरी लावली. डॉ. लहाने आणि इंदुलकर यांना उत्तर देण्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंतची मुदत कोर्टाने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 09:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close