मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कपाळी टिळा, राम-कृष्ण हरीचा जप! 20 रुपयात नाश्ता देणारा कोण आहे ग्रॅज्युएट वारकरी? पाहा Video

कपाळी टिळा, राम-कृष्ण हरीचा जप! 20 रुपयात नाश्ता देणारा कोण आहे ग्रॅज्युएट वारकरी? पाहा Video

X
कपाळाला

कपाळाला टिळा लावून 'राम कृष्ण हरी' जप करत फक्त 20 रुपयात हा तरुण नाश्ता विकतो. त्याचा स्टॉल हा सर्व मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

कपाळाला टिळा लावून 'राम कृष्ण हरी' जप करत फक्त 20 रुपयात हा तरुण नाश्ता विकतो. त्याचा स्टॉल हा सर्व मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  धनंजय दळवी, प्रतिनिधी

  मुंबई, 31 मार्च : कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. मुंबईतील मंगेश कचरेकर या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी काही मिळत नव्हती. अश्यातच स्वतःचा व्यवसाय असावा यासाठी त्याने नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

  पारंपरिक मराठी पद्धतीचा नाश्ता

  मुंबईतील मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या मंगेश कचरेकर या तरुणाने मालाड पश्चिम स्थानकाबाहेर नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला आहे. जय मल्हार असं मंगेश याच्या स्टॉलच नावं असून तो सायकलवर पारंपरिक मराठी पद्धतीचा नाश्ता विकतो. पदवीचं शिक्षण घेतलेला तरुण पांढरी टोपी, सदरा लेंगा घालून, कपाळाला टिळा लावून 'राम कृष्ण हरी' जप करत फक्त 20 रुपयात नाश्ता विकतो. हे पाहून मुंबईकर या ठिकाणी येत असतात. हा स्टॉल सर्व मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

  ग्रॅज्युएट वारकरी नाश्तावाला

  सोशल मीडियावर आणि मुंबईकर आता मंगेशला ग्रॅज्युएट वारकरी नाश्तावाला म्हणून ओळखू लागले आहे. गरमा गरम कांदे पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, चणा मसाला असे चार प्रकार मंगेश याच्याकडे 20 रुपये प्रति मिळतात. मालाड पश्चिमेला स्थानकाबाहेर सोन्या मारुती मंदिर समोर मंगेश याचा स्टॉल सकाळी 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत असतो. यवतमाळ जिल्ह्यातील माणिकराव ठाकरे यांच्या गावचा हा तरुण मुंबईत छोट्या गोष्टीतून मोठं स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करत आहे.

  स्वतःचा व्यवसाय असणं हे सर्वात उत्तम 

  मी दहावीपर्यंत शिक्षण हे आपल्या गावीच घेतलं. त्यानंतर कॉमर्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी नोकरीच्या शोधात होतो मात्र नोकरी मिळाली नसल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आणि लहान असा सायकल वर नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला. स्वतःचा व्यवसाय असणं हे सर्वात उत्तम आहे. मी वारकरी संप्रदाय मधून असल्यामुळे पारंपारिक पोशाख घालून नाश्ता विकतो, असं मंगेश सांगतो.

  First published:
  top videos

   Tags: Local18, Local18 Food, Mumbai